'बिग बी'साठी महिंद्रांनी ट्विट केलं आणि अदर पुनावालांनी दिलं भन्नाट उत्तर

Adar Poonawalla Responds To Anand Mahindras Big V Vaccine Tweet
Adar Poonawalla Responds To Anand Mahindras Big V Vaccine Tweet

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यांनी त्यांच्या हितचिंतकांचे आभार मानले असून तसे ट्विटही त्यांनी केले आहे. त्या ट्विटला महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत उत्तर दिले होते. त्यात त्यांनी सिरम इंस्टीट्यूटचे मालक अदर पूनावाला यांना टॅग करत अदर पूनावालांनी आता बिग व्ही लसीची निर्मिती करायला हवी, असे म्हटले होते, याला अदर पुनावालांनी भन्नाट उत्तर दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अदर पूनावाला म्हणाले, 'माझे शास्त्रज्ञ हे 'बिग व्ही' लसींवर काम करत असून ते लवकरच बाजारात येईल आणि सर्वांसाठी उपलब्धही होईल. अमिताभ बच्चन यांचे स्वागत!' असे उत्तर आनंद महिंद्रांच्या ट्विटला अदर पूनवाला यांनी दिले आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नानावटी रुग्णलयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी अमिताभ बच्चन लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती आणि म्हटले होते की, अमिताभ बच्चन यांच्याजवळच फक्त अशी एक लस आहे ज्याने लवकरात लवकर कोरोनावर मात करता येऊ शकते, त्या लसीचे नाव आहे 'बिग व्ही'. आता अमिताभ यांनी कोरोनावर मात  केली असून ते घरी परतले आहेत तर आता सिरम इन्स्टीट्यूटने या औषधाची निर्मिती करायला हवी आणि हे औषध आमच्यासोबत सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायला हवे. 

अदर पूनावाला भारतातील सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आणि मालक आहेत, त्यांनीही आनंद महिंद्रांच्या ट्विटला मजेशीर असे उत्तर दिले असून त्यांनी आश्वस्त केले की आमचे शास्त्रज्ञ यावर काम करत असून लवकरच लस निर्माण करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com