NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल
NEP 2020 : आणीबाणीला भारतीय लोकशाहीसमोरील एक मोठे आव्हान म्हणून सादर करण्यात आले आहे.या काळात मूलभूत अधिकार स्थगित झाले. विद्यार्थ्यांना लवकर टप्प्यातच लोकशाही इतिहास समजावा हा या बदलामागचा मुख्य उद्देश आहे.
एनसीईआरटीने इयत्ता ९ वीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात पहिल्यांदाच १९७५-७७ मधील 'आणीबाणी'चा समावेश केला आहे. हा निर्णय 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२०' अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात केल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांचा एक भाग आहे.