
नवी दिल्ली : आक्रमक बाबर हा क्रूर विजेता होता. अकबर हा सहिष्णू आणि क्रूर अशा दोन्ही प्रकारचा तर औरंगजेब हा मंदिरे आणि गुरुद्वारा तोडणारा होता, असा आशय असलेले नवे पुस्तक राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आणले आहे. सामाजिक विज्ञान विषयात हे पुस्तक सामील करण्यात आले आहे.