NCERT च्या पुस्तकात 'आधारहीन' इतिहास? मुघलांशी निगडीत नाहीये माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

NCERT च्या 12 वीच्या अभ्यासक्रमावरुन आता पुन्हा एकदा वाद उफाळला आहे.

नवी दिल्ली : NCERT च्या 12 वीच्या अभ्यासक्रमावरुन आता पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. 12 वीच्या इतिहासाच्या पुस्तकात थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री पार्ट-टू मध्ये मुघल शासकांकडून युद्धाच्या दरम्यान मंदिरांना पाडले जाणे आणि त्यानंतर त्याची दुरुस्ती केली गेल्याचा उल्लेख आहे. यासंबंधी शिवांक वर्मा यांनी NCERT कडे माहितीच्या अधिकारातून काही माहिती मागवली होती.

या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी अगदी तोकड्या शब्दात RTI मध्ये म्हटलं गेलंय की विभागाकडे मागितलेल्या माहितीसंदर्भात फाईलमध्ये कोणतीही माहिती उपलब्ध नाहीये. या पार्श्वभूमीवर असा प्रश्न उपस्थित होतो की NCERT च्या इतिहासाच्या पुस्तकात कशाच्या आधारे इतिहास शिकवला जातोय? यासंदर्भात शिक्षण क्षेत्राशी निगडीत डॉ. इंदु विश्वनाथन यांनी ट्विट केलं आहे. 

मागच्या वर्षी NCERT च्या 12 वीच्या इतिहासाच्या  पुस्तकात थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री पार्ट-टूच्या 234 क्रमांकाच्या पानावरील दुसऱ्या परिच्छेदामध्ये दिलेल्या माहितीचा स्त्रोत विचारला गेला होता. या परिच्छेदात म्हटलंय की जेंव्हा युद्धाच्या दरम्यान मंदिरांना पाडण्यात आलं होतं तेंव्हा त्यानंतर शाहजहान आणि औरंगजेबने या मंदिरांच्या दुरुस्तीसाठी ग्रांट जाहीर केलं होतं.

दोन्ही प्रश्नाचं एकसारखंच उत्तर
आरटीआयमध्ये दुसरा प्रश्न होता की औरंगजेब आणि शाहजहान यांनी किती मंदिरांची दुरुस्ती केली होती? NCERT ने दोन्हीही प्रश्नांची उत्तरे एकसारखीच दिली होती. 18 नोव्हेंबर 2020 ला जाहीर केलेल्या पत्रात माहिती विभागाकडे यासंदर्भात कसलीही माहिती नसल्याचं म्हटलं होतं. या पत्रावर हेड ऑफ डिपार्टमेंट एँड पब्लिक इन्फोर्मेशन ऑफिसर प्रो. गौरी श्रीवास्तव यांचे हस्ताक्षर आहे.

ट्विटरवर ट्रेंड होतंय मुघल आणि NCERT
आरटीआयवरील NCERT च्या या उत्तरानंतर ट्विटरवर मुघल हा शब्द ट्रेंड होत आहे. तसेच NCERT देखील ट्रेंड होत आहे. यावरुन सध्या सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncert said in rti response no information about mughal era temple destroyed and repaired