सायरस मिस्त्री पुन्हा होणार टाटा समुहाचे अध्यक्ष?; पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

राष्ट्रीय कंपनी लवादाने (एनसीएलएटी) या प्रकरणी आज सुनावणी करताना सायरस मिस्त्रींना मोठा दिलासा दिला आहे. सायरस मिस्त्रींनी टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर याचिका दाखल केली होती.

नवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या सायरस मिस्त्रींचा पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून, राष्ट्रीय कंपनी लवादाने त्यांची हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय कंपनी लवादाने (एनसीएलएटी) या प्रकरणी आज सुनावणी करताना सायरस मिस्त्रींना मोठा दिलासा दिला आहे. सायरस मिस्त्रींनी टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर याचिका दाखल केली होती. एलसीएलएटीच्या दोन सदस्यीय पीठाने आज (बुधवार) सायरस मिस्त्रींची हकालपट्टी बेकायदेशीर ठरविली आहे. तसेच त्यांनी टाटा समुहाला आपली भूमिका मांडण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय हे या पीठाचे अध्यक्ष आहेत.

आता अक्षय कुमारही देतोय अमित शहांना सल्ले!

टाटा उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन अचानक हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय कठोर असून त्यामुळे अत्यंत मोठा धक्का बसल्याचे सायरस मिस्त्री यांनी एका पत्राच्या माध्यमामधून म्हटले होते. कॉर्पोरेट विश्‍वात या घडामोडीमुळे खळबळ उडाली होती. टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबामध्ये 18.4 टक्के शेअर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCLAT reinstates Cyrus Mistry as executive chairman Tata Group