esakal | Exclusive : शरद पवारांनी भेटीदरम्यान मोदींना दिले पत्र; पाहा...
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

मोदी आणि पवार यांच्यात आज दुपारी साडेबारा वाजता लोकसभेत भेटीला सुरवात झाली. या भेटीदरम्यान पवार यांनी महाराष्ट्रात ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांविषयी माहिती दिली.

Exclusive : शरद पवारांनी भेटीदरम्यान मोदींना दिले पत्र; पाहा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राज्यातील ओला दुष्काळासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी पत्र दिले. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली, यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शरद पवारांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील 325 तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. 54.22 लाख हेक्टरमधील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नाशिक, विदर्भातील शेतकऱ्यांच्या भेट घेतल्या. शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट व वेदनादायी आहे. राज्यपालांचे 8 हजारांचे पॅकेज कमी आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे 10 हजार कोटींचे पॅकेज मिळालेच नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. 2012-13 ला आम्ही हेक्टरी 30 हजार मदत केली होती. 

मोदी आणि पवार यांच्यात आज दुपारी साडेबारा वाजता लोकसभेत भेटीला सुरवात झाली. या भेटीदरम्यान पवार यांनी महाराष्ट्रात ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांविषयी माहिती दिली. पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती मांडल्यानंतर मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बोलावून घेतले. या नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून गंभीर चर्चा झाली.

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...

या दोन्ही नेत्यांमध्ये मंगळवारीच भेट होणार होती. पण, ती होऊ न शकल्याने आज ही भेट झाली. शेतकरी प्रश्नावर पवार भेटणार हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, मराठवाड्यातही पिके वाया गेली आहेत. यावरून राज्यपालांनी केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आता केंद्रातून मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top