संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

संजय राऊत यांनी आज आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनो के विघ्नो ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने, नव दधीची हड्डिया गलाए, आओ फिर से दिया जलाए, अशी अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट करून भाजपला चिमटा काढला आहे.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (बुधवार) पुन्हा एकदा आपला ट्विट कार्यक्रम सुरुच ठेवला असून, आज त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट केली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊत यांनी आज आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनो के विघ्नो ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने, नव दधीची हड्डिया गलाए, आओ फिर से दिया जलाए, अशी अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट करून भाजपला चिमटा काढला आहे. अपनो के विघ्नों ने घेरा असे म्हणत त्यांनी थेट भाजपा डिवचले आहे. तर, पुन्हा एकदा दिवा लावणार असेही याचा अर्थ होतो.

सत्ता सहभागाबाबत कॉंग्रेसमध्ये मतप्रवाह ?

शिवसेनेने पहिल्यापासून मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगितलेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सतत ते सांगत आले आहेत, शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही आणि मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल. दिल्लीत मंगळवारी सायंकाळी राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली होती. आज काँग्रेस आणि ऱाष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होत आहे. यामध्ये सत्तास्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता आहे.

सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे; आज काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut tweet AtalBihari Vajpayee poem