NCP News : राष्ट्रवादीला काँग्रेसला मोठा दिलासा! निलंबीत नेत्याची खासदारकी पुन्हा बहाल

NCP leader Mohammad Faizal disqualification from Lok Sabha revoked political news
NCP leader Mohammad Faizal disqualification from Lok Sabha revoked political news sakal

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात राजकारण तापले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. खासदारकी रद्द झालेले राष्ट्रवादीचे नेते मोहम्मद फैजल यांची लोकसभेतील अपात्रता रद्द करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदा फैजल यांची खासदारकी त्यांना पुन्हा बहाल केली जाणं मोठा निर्णय मानला जात आहे. फेसल यांनी त्यांची खासदारकी रद्द झाल्याबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर आजच निर्णय येणार होता. त्यापुर्वीच त्यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे.

NCP leader Mohammad Faizal disqualification from Lok Sabha revoked political news
Girish Bapat Health : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली

फैसल १३ जानेवारीला स्थानिक कोर्टाने निर्णय दिल्यानंतर लोकसभा सदस्यत्व रद्द झालं होतं. यानंतर २५ जानेवारीला हायकोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. या काळात निवडणूक आयोगाकडून पौटनिवडणूक देखील जाहीर करण्यात आली. त्याविरोधात फैसल सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या तत्परतेबद्दल निवडणूक आयोगाला फटकारलं.

NCP leader Mohammad Faizal disqualification from Lok Sabha revoked political news
Rahul Gandhi : शासकीय निवासस्थान सोडल्यानंतर राहुल गांधी कुठे राहणार?

हायकोर्टाने शिक्षा थांबवल्यानंतर देखील लोकसभा कार्यालयाने त्यांच्या निलंबनाबद्दलचा निर्णय मागे घेतला नव्हता. दरम्यान आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणाचा निकाल येणार होता. यापूर्वीच लोकसभा कार्यालयाने त्यांची खासदारकी पुन्हा बहाल केल्याचे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com