उदयनराजेंना पराभूत करणाऱ्या श्रीनिवास पाटलांनी घेतली शपथ

वृत्तसंस्था
Monday, 18 November 2019

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. यापूर्वी दोन वेळा मी या सभागृहाचा सदस्य होतो. तिसऱ्यांदा सभागृहात येताना माझ्याकडून जनतेच्या असणाऱ्या अपेक्षांची मला जाणीव आहे.

नवी दिल्ली : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज (सोमवार) लोकसभेत शपथ  घेतली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार होते. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ती संख्या तीनवर आली होती. साताऱ्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंचा सुमारे लाखभराच्या मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीनिवास पाटलांसाठी भर पावसात घेतलेली सभा अजूनही सर्वांच्या लक्षात आहे.

सरकार स्थापनेबद्दल शिवसेनेला विचारा, शरद पवारांचे धक्कादायक वक्तव्य

श्रीनिवास पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे, की संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. यापूर्वी दोन वेळा मी या सभागृहाचा सदस्य होतो. तिसऱ्यांदा सभागृहात येताना माझ्याकडून जनतेच्या असणाऱ्या अपेक्षांची मला जाणीव आहे. आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Sriniwas patil takes oath as Loksabha MP