esakal | सरकारबद्दल भाजप आणि शिवसेनेला विचारा; पवारांच्या वक्तव्याने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेनेला विचारा. शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढविली होती. सरकार कसे बनणार हे त्यांनाच विचारा. शिवसेना सरकार स्थापन करत आहे. सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट असणार आहे. 

सरकारबद्दल भाजप आणि शिवसेनेला विचारा; पवारांच्या वक्तव्याने खळबळ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत तुम्ही सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजप आणि शिवसेनेला विचारा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शरद पवार म्हणाले, की सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेनेला विचारा. शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढविली होती. सरकार कसे बनणार हे त्यांनाच विचारा. शिवसेना सरकार स्थापन करत आहे. सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट असणार आहे. 

पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज (सोमवार) दिल्लीत भेट होणार असून, राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग येणार असून, आता सत्तास्थापनेचा केंद्र दिल्ली असणार हे निश्चित आहे. मात्र, त्यापूर्वीच पवारांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर समितीतील नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले आहेत.

शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर