दिल्लीत राष्ट्रवादीला कष्ट करण्याची गरज : शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

दिल्लीत राष्ट्रवादीला कष्ट करण्याची गरज : शरद पवार

sakal_logo
By
संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : केंद्राने सीबीआय, ईडीचा कार्यकाळ वाढविला आहे. विरोधी पक्षांना या निवडीत स्थान असते. ते डवलले आहे. त्याला विरोध करण्यासाठी या संबंधी संसदेच्या अधिवेशनावेळी सर्व विरोधी पक्ष रणनीती ठरवतील, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

काँग्रेसचे नेते योगानंद शास्री यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाची दिल्लीतील ताकद वाढविण्याबरोबरच जातीय शक्तींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: नियोजन उणे नागरिक वाहतूक कोंडी

दिल्लीत राष्ट्रवादीला कष्ट करण्याची गरज. देशाच्या राजधानीत राष्ट्रीय पक्षाचे चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. त्यामुळे समविचारी लोकांना बरोबर घेत आहोत. योगानंद शास्री यांच्या प्रवेशाबाबत गेल्या काही महिन्यापासून चर्चा सुरू होती. दिल्लीतील जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी सूचना त्यांन केली. त्यांचा स्वीकार त्यांनी केला. त्यांचे कार्यकर्तेही पक्षात आले आहेत, असे पवार म्हणाले.

देशात समविचारी पक्षांनी राष्ट्रहितासाठी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करतोय. सांप्रदायिक शक्तींना पर्याय दिला पाहिजे. भाजपला रोखण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. समविचारी पक्षांना बरोबर एकत्र घेतो आहोत. पण त्याबरोबर आमचे घरही आम्हाला मजबूत करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: राज्यात 3 दिवस रेन अलर्ट! कुठे मुसळधार, कुठे हलका पाऊस?

समीर वानखेडे जो अधिकाराचा गैरवापर होतोय त्याबाबत नवाब मलिक बोलत आहेत. वानखेडे प्रकरणी केंद्राने लक्ष दिले पाहिजे, असे सांगता नवाब मलिक यांच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले.

राज्याला पार्टटाइम मुख्यमंत्री नको, असे विधान करीत भाजपने उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे. त्याचा समाचार पवार यांनी घेतला. "त्या वक्तव्यात दम नाही, मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो. त्यांना जबाबदारी दिली आहे, जनतेने स्वागत केलं आहे. ठाकरे यांच्यावर ऑपरेशनचे संकट आले होते. पण तरीही ते काम सुरू करत आहेत, अशा शब्दांत पवार यांनी उद्धव यांचे कौतुक केलै.

त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले हे योग्य नाही. पण राज्यात जे झाले, ते धर्मांध शक्तीमुळे झाले. देशात धर्मांध शक्तीचे आव्हान आहे, असे स्पष्ट करताना महाविकास आघाडी काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचा भाजप राज्य कार्यकारिणीत ठराव केला हा हास्यस्पद ठराव असल्याची टीका त्यांनी केली.

loading image
go to top