राज्यात 3 दिवस रेन अलर्ट! कुठे मुसळधार, कुठे हलका पाऊस? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain update

राज्यात 3 दिवस रेन अलर्ट! कुठे मुसळधार, कुठे हलका पाऊस?

पुणे : पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दिवाळीमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्र किनाऱ्यापासून दूर गेल्यामुळे कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव कमी जाणवला होता. आता पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र यामुळे काही ठिकाणी पीकांचे नुकसान होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.


पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज - IMD

हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.

हेही वाचा: सध्या ‘काय ते दे द्या’चे राज्य ; भ्रष्टाचारावरून फडणवीस यांची टीका

'या' राज्यात पावासाचा इशारा
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्यप्रदेशमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आलाय.17 आणि 19 तारखेला तेलंगणाच्या समुद्र किनाऱ्या लगतच्या भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


मागील काही दिवसात कुठे झाला पाऊस?

मंगळवारी रात्री राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. कोकण, सातारा आणि पुण्यात पावासाने धुवाधार बँटिग केली. रात्री एक ते पहाटे तीन पर्यंत सातारा शहर परिसर, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात तब्बल दोन तास मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. या पावसामुळे महाबळेश्वर पाचगणीमधील स्ट्रॉबेरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर कोकणातील पावसामुळे आंब्याच्या नुकसानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी, खेड येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. दापोली, मंडणगडात ढगाळ वातावरण होते, काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला; तर चिपळूण, संगमेश्‍वरसह लांजा-राजापुरात पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सायंकाळी एक तास कोसळलेल्या पावसाने रत्नागिरीकरांची तारांबळ उडाली.

हेही वाचा: शाळा-कॉलेज पुढच्या आदेशापर्यंत बंद; दिल्ली हवा प्रदुषणाने 'लॉक'

केरळमध्ये पाच जणांचा मृत्यू

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगळुरुमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेमध्ये दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झालाय.

हेही वाचा: संबंधांचे रुपांतर संघर्षात नको; बायडेन आणि जिनपिंग यांचे एकमत

पुढील काही दिवसात तुमच्या भागातील वातावरण कसे असेल....

कर्नाटक किनारपट्टी जवळील पूर्व मध्य अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील ४८ तासात ही प्रणाली पश्चिम - उत्तरपश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्र सपाटी पासून ५.८ किम. उंची पर्यंत आहे. ह्याच्या प्रभावामुळे पुढील ३ -४ दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोंकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रतात मेघगर्जनेसह हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सांगली(जत, खानापुर, कवठे महंकाळ, आटपाडी, तासगांव, वाळवा, पलुस, मिरज) या भागात १७-१८ आणि २१-२२ तारखे मध्‍ये विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सोलापुर( अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर सोलापुर, पंढरपुर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ) या भागात १७-१८ आणि २१-२२ तारखे मध्‍ये विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पुणे(बारामती, इंदापूर, बोरी, नारायणगांव, कळंब) या भागात १७-१८ आणि २१-२२ तारखे मध्‍ये विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सातारा(फलटण, खटाव, पाटण, महाबळेशवर) या भागात १७-१८ आणि २१-२२ तारखे मध्‍ये विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

नाशिक(सटाणा, चांदवड, कळवण, येवला, निफाड, लासलगांव, सिन्नर, दिंडोरी) या भागात १७ - २१ तारखे मध्‍ये विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

-राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे आणि क्रोपटेक यांच्या संयुक्त विद्यमाने

loading image
go to top