
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजितदादा गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांनी पक्षावर दावा करत कायदेशीर लढाई सुरु केली आहे. याची सुनावणी आज निवडणूक आयोगात पार पडली.
यावेळी दीड तास चाललेल्या सुनावणीत शरद पवार गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तीवाद केला. अजितदादा गटावर आरोप करताना मृत व्यक्तींच्या नावेही प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा दावा त्यांनी केला. (NCP Party Symbol Election Commission hearing Abhishek Manu Singhvi strong claims against Ajit Pawar group)
सिंघवी म्हणाले, "अजित पवार गटानं सादर केलेल्या २० हजारांपैकी ८,९०० शपथपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं आम्ही आयोगाला दाखवून दिलं. यामध्ये मृत व्यक्ती, अल्पवयीन, इतर पक्षातील सदस्यांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर संविधानात नसलेली पदं, गृहिणी, सेल्स मॅनेजर अशा लोकांचाही यात सामावेश आहे. (Latest Marathi News)
अशा प्रकारच्या बनावट सदस्यांची आम्ही २४ प्रकारांची वर्गवारी केली आहे. अशा प्रकारे बनावट शपथपत्रं कशी करण्यात आली, हे निवडणूक आयोगासमोर आम्ही मांडलं"
त्यामुळं खोटे आणि बनावट शपथपत्रं दाखल केल्याप्रकरणी अजितदादा गटाविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगासमोर केली. यानंतर आता २० नोव्हेंबरपासून याप्रकरणी निवडणूक आयोगात नियमित सुनावणी होणार आहे. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.