esakal | Breaking:'परम बीर सिंग यांनी माझी भेट घेतली होती'; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया 
sakal

बोलून बातमी शोधा

sharad_pawar

वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

Breaking:'परम बीर सिंग यांनी माझी भेट घेतली होती'; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा धक्कादायक खुलासा परम बीर सिंग यांनी पत्रात केला होता. त्यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आज, शरद पवार यांनी दिल्लीतील निवासस्थांनी पत्रकारांशी संवाद साधून, पहिल्यांदाच याविषयावर भाष्य केले. 

काय म्हणाले शरद पवार?

 • परम बीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर
 • पत्रातमध्ये माझ्याही नावाचा उल्लेख
 • परम बीर सिंग यांनी माझी भेट घेतली 
 • माझ्याशी त्यांनी चर्चाही केली 
 • पत्रावर परम बीर सिंग यांची सही नाही
 • सचिन वाझे यांना सेवेत घेण्याचा निर्णय परम बीर सिंह यांचाच
 • वाझेंना पुन्हा नियुक्त करण्यात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा हात नाहीच 
 • पत्रात उल्लेख केलेले 100 कोटी रुपये कोणाकडे गेले
 • परम बीर सिंग यांनी भेट घेतल्यानंतर वाझे प्रकरणाच्या तपासाची मागणी केली होती 
 • बदली झाल्यानंतरच परम बीर सिंग यांनी आरोप केले 
 • आयुक्त असताना परम बीर सिंग यांनी कोणतेही आरोप का केले नाहीत?

हेही वाचा- 'लेटरबॉम्ब'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; दिले गुजरातचे संदर्भ 

हेही वाचा-  Video : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेले आरोप खोटे

loading image