शरद पवारांची कोरोनावर मात; ट्विट करत मानले डॉक्टरांचे आभार l Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर कोरोनातून लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर आणि प्रार्थना करणारे मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले

शरद पवारांची कोरोनावर मात; ट्विट करत मानले डॉक्टरांचे आभार

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सात दिवसांच्या उपचारानंतर अखेर कोरोनामुक्त (Corona) झाले आहेत. कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर कोरोनातून लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर, प्रार्थना करणारे मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले आहेत. कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती खुद्द शरद पवारांनीच ट्विट करत दिली आहे. (Sharad Pawar Tested Corona Negative)

२४ जानेवारी रोजी त्यांनी स्वतः ट्विट करत पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होत की, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. डॉक्टरांनी सूचवल्याप्रमाणं मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले असतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी"

Web Title: Ncp Shard Pawar Corona Report Is Negative Mumbai Covid 19 News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top