Bihar Assembly Elections: ‘एनडीए’मध्ये जागावाटप निश्‍चित; बिहारमध्ये भाजप-जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढविणार

Bihar Elections 2025: नितीश यांनी या पाच वर्षांपैकी काही काळ राष्ट्रीय जनता दलाला हाताशी धरूनही सत्ता केली. मात्र, नंतर ते पुन्हा भाजपबरोबर आले. या कालावधीत चिराग पासवान मात्र भाजपच्या बाजूने ठाम उभे राहिले. त्याचा त्यांना जागावाटपात फायदा झाला आहे.
BJP and JD(U) leaders finalize NDA seat-sharing arrangement for Bihar Assembly elections 2025.

BJP and JD(U) leaders finalize NDA seat-sharing arrangement for Bihar Assembly elections 2025.

Sakal

Updated on

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात जागावाटपावरून एकमत झालेले नसताना सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मात्र यात आघाडी घेतली आहे. राज्यातील एकूण २४३ जागांपैकी भाजप आणि संयुक्त जनता दलाने प्रत्येकी १०१ जागा लढविण्याचे निश्‍चित केले असून चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षालाही २९ जागा देण्यात आल्या आहेत. भाजपचे बिहार प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी आज ही घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com