Bihar Election: मध्यरात्री निवडणुकीचे चित्र स्पष्ट; एनडीएला बहुमत, 125 जागांवर विजय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारला बहुमत मिळाले आहे.

पाटणा Bihar Election 2020- निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेच्या सर्व 243 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारला बहुमत मिळाले आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. सुरुवातीला आघाडीवर असलेली महाआघाडी 111 जागांवरच थांबली. 

एनडीएमध्ये भाजपच्या खात्यात 74 जागा गेल्या आहेत. एनडीएचे सहकारी पक्ष जेडीयूला 43, व्हीआयपी 4 आणि हम पक्षाला 4 जागा मिळाल्या आहेत. तर महाआघाडीमध्ये आरजेडीला 76, काँग्रेसला 19 आणि डाव्या पक्षाला 16 जागा मिळाल्या. 

हेही वाचा- Bihar Election 2020: मोदीदूत!

मतांच्या टक्केवारीत सर्वाधिक वाटा आरजेडीचा असून त्यांना 23.1 टक्के मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला 9.48 टक्के आणि डाव्या पक्षाच्या खात्यात 1.48 टक्के पडली आहेत. एनडीएमध्ये भाजपला 19.46 टक्के, जेडीयूने 15.38 टक्के मते मिळवली आहेत. 

एनडीए-125

भाजप- 74

जेडीयू- 43

विकासशील इन्सान पार्टी- 04

हिन्दुस्तानी अवाम मोर्चा- 04

महाआघाडी- 110

आरजेडी- 75

काँग्रेस- 19

भाकपा-माले- 12

सीपीएम- 02

सीपीआय- 02

तर  ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) ने 5, बहुजन समाज पार्टीने एक, लोक जनशक्ति पार्टी ने एका जागेवर विजय मिळवला तर अपक्षाच्या खात्यात एक जागा गेली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDA gets majority in Bihar Assembly polls as EC announces results