NDA की INDIA, मुस्लिमांची मतं कोणाला मिळाली? एक्झिट पोलचा काय आहे अंदाज

NDA or INDIA who got Muslim votes: भाजपला मिळणाऱ्या मुस्लिम मतांमध्ये घट होत असल्याचं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे.
muslim voter
muslim voter

नवी दिल्ली- लोकसभा निकालाचे एक्झिट पोल समोर आले असून यामध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील इंडिया आघाडीला बहुमत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी भाजपला मिळणाऱ्या मुस्लिम मतांमध्ये घट होत असल्याचं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, २०२४ मध्ये भाजपला मिळणाऱ्या मुस्लिमांच्या मतामध्ये तीन टक्यांनी घट होणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जवळपास ९ टक्के मुस्लिमांची मतं मिळाली होती. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला ६ टक्के मुस्लिमांची मतं मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार भाजपपासून आणखी दूर होत असल्याचा निष्कर्ष काढता येईल.

muslim voter
Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

दुसरीकडे, इंडिया आघाडीच्या बाजूने मोठ्या संख्येने मु्स्लिम मतदार येत असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या मुस्लिम मतांमध्ये २४ टक्क्यांची घसघशीत वाढ होईल असा अंदाज आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ५२ टक्के मुस्लिम मतं मिळाली होती. यावेळी इंडिया आघाडीला ७६ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीआधी चांगले वातावरण निर्माण केले होते. शिवाय, त्यांनी देशात भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा काढून लोकांना आपले करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी यांनी मुस्लिमांबाबत केलेली काही वक्तव्ये आणि राहुल गांधी यांनी 'संविधान बचाओ'चा दिलेला नारा यामुळे काँग्रेसच्या मुस्लिम वोटबँकेत वाढ होण्याचा अंदाज आहे.

muslim voter
Rahul Gandhi on Exit Poll: "सिद्धू मुसेवालाचं गाणं ऐकलंय का?..."; राहुल गांधींची एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

एक्झिट पोलनुसार, इंडिया आघाडीच्या पक्षांना उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांची ३८ टक्के अतिरिक्त मते मिळण्याचा अंदाज आहे. बसपला मिळणारे ३४ टक्के मुस्लिम मतं इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. बसपने स्वतंत्र निवडणूक लढली होती. पक्षाने अनेक मुस्लिम मतदार दिले होते. पण, एक्झिट पोलनुसार बसपला काहीही फायदा झाला नसल्याचं दिसत आहे. बिहारमध्ये इंडिया आघाडीला मुस्लिमांची १६ टक्के अतिरिक्त मतं मिळतील, तर पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या मुस्लिम वोट बँकेमध्ये घट होत असल्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com