
NDA meeting confirms Vice President election strategy: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी एनडीए आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे एनडीए आघाडीचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करतील, असा ठराव घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर केंद्रीयमंत्री किरेन रिजीजून यांनी मीडियाशी बोलताना याबाबत माहिती दिली.
संसद भवनात झालेल्या एनडीएच्या नेत्यांच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांच्याव्यतिरिक्त भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, राम मोहन, लल्लन सिंह, अपना दल (एस) च्या नेत्या अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले इत्यादी उपस्थित होते. उपराष्ट्रपती निवडणुकीला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी एक दिवस आधीच बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तडकाफडकी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे त्यांचा कार्यकाळ सन २०२७ मध्ये संपणार होता.
मात्र प्रकृतीचे कारण त्यांनी या राजीनाम्यासाठी दिले होते, तरीही या राजीनाम्यामागेही राजकारणच असल्याचे बोलले जात होते. तर धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, माजी मंत्री रविशंकर प्रसाद आणि कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावांचा समावेश आहे.
परंतु भाजपच्या नेहमीच्या धक्कातंत्राप्रमाणे एखाद्या वेगळ्याच व्यक्तीला या पदावर बसवले जाऊ शकते, असंही बोललं जात आहे. भाजपच्या जवळच्या एखाद्या उमेदवाराला हे पद मिळू शकते, असेही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.