भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जयदीप धनखड यांना उमेदवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jagdeep Dhankhar

भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जयदीप धनखड यांना उमेदवारी

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) हे एनडीए आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. दिल्लीत पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठकी चर्चेअंती धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले. भाजप मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. याच बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जगदीप धनखर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Jagdeep Dhankhar News In Marathi)

उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै असून मतदान 6 ऑगस्टला होणार आहे. यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी भाजपने आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्यास त्या देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील. 2017 मध्ये एनडीएने तत्कालीन केंद्रीय मंत्री वैकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन दिले होते.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी येत्या 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडणार असून, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीही केली जाणार आहे.

Web Title: Ndas Candidate For The Post Of Vice President Of India To Be Jagdeep Dhankhar Says Bjp Chief Jp Nadda

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..