देशात कोरोनाचा दैनंदिन संसर्ग दरात वाढ; 24 तासांत 17,092 रूग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update India

देशात कोरोनाचा दैनंदिन संसर्ग दरात वाढ; 24 तासांत 17,092 रूग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात नव्या कोरोना बाधितांच्या दैनंदिन संसर्ग (Corona Positive Rate) दरात वाढ नोंदवण्यात आली असून देशाचा दैनंदिन संसर्ग दर 4.14 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. तर, गेल्या 24 चोवीस तासांत 17,092 नव्या कोराना बाधितांची नोंद करण्यात आली असून, 29 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशासह नागरिकांच्या चिंते भर पडली आहे. तर, 14,684 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 1,09,568 इतके सक्रिय रुग्ण आहे. (India Corona Update News In Marathi)

देशातील साप्ताहिक संसर्ग दर 3.56 टक्के नोंदवला गेला असून मृत्युदर (Corona Death Ration) 1.21 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. दुसरीकडे देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत (India Corona Vaccination) आतापर्यंत कोविड लसीचे 197.84 कोटी डोस देण्यात आले आहेत. (India Corona Update )

हेही वाचा: फडणवीसांना 'उप'मुख्यमंत्री म्हणणं जड जातंय - संजय राऊत

महाराष्ट्रात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 3249 कोरोनाच्या (Maharashtra Corona) नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 4189 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक रूग्ण हे मुंबईत (Mumbai Corona) असून येथे गेल्या 24 तासांत 978 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, राज्यात काल चार कोरोना बाधितांच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राज्याच्या रूग्ण बरे होण्याचा दर 97.85 टक्क्यांवर तर मृत्यूदर 1.85 टक्के इतका झाला आहे. (Maharashtra Corona Update News In Marathi)

Web Title: Ndia Reports 17092 Fresh Cases 14684 Recoveries And 29 Deaths In The Last 24 Hours

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..