
60 सदस्यीय राज्य विधानसभेच्या 59 जागांसाठी चार महिला आणि 19 अपक्षांसह 183 उमेदवार रिंगणात आहेत.
Nagaland Election : नागालँडमध्ये भाजपचं वर्चस्व कायम; 'इतक्या' जागांवर घेतली आघाडी
कोहिमा : नागालँड विधानसभा निवडणुकीत (Nagaland Assembly Election) मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, सत्ताधारी एनडीपीपी-भाजप युती (NDPP-BJP Alliance) सत्ता राखताना दिसत आहे.
सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये NDPP-भाजप युती 40 पेक्षा जास्त जागांवर पुढं आहे, तर NPF नं सहा जागांवर आघाडी कायम ठेवलीये. आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली.
60 सदस्यीय राज्य विधानसभेच्या 59 जागांसाठी चार महिला आणि 19 अपक्षांसह 183 उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार काझेटो किन्मी यांना झुन्हेबोटो जिल्ह्यातील अकुलुतो मतदारसंघातून बिनविरोध घोषित करण्यात आलंय. राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान झालं होतं.
राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांनी निवडणूकपूर्व युती केली होती. एनडीपीपीनं 40 जागांसाठी उमेदवार उभे केले, तर भाजपनं 20 जागांसाठी उमेदवार उभे केले. नेफियू रिओ हे आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. दुसरीकडं 2003 पर्यंत राज्यात सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसनं 23 जागांवर नशीब आजमावलं. सध्याच्या विधानसभेत त्यांचा एकही सदस्य नाहीये.
गेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत 26 जागा जिंकणाऱ्या NPF नं 22 जागांसाठी आपले उमेदवार उभे केले होते, परंतु त्यापैकी एकानं माघार घेतली आणि आता त्यांचे 21 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 19 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. यावेळी नागालँडच्या निवडणुकीच्या मैदानात 183 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. नागालँडमधील 60 विधानसभा मतदारसंघांपैकी 59 मतदारसंघात 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका झाल्या.