विदेशी प्रवाशांना वाचविताना कर्नाटकात एनडीआरएफची बोट बुडाली 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 August 2019

बंगळूर - आपले प्राण पणाला लावून कोप्पळ जिल्ह्याच्या गंगावती तालुक्‍यातील विरुपापूर घाटात 25 विदेशी प्रवाशांसह 300 पेक्षा अधिक प्रवाशांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करणारे एनडीआरएफ आणि अग्निशमक दलाचे जवान बोट बुडाल्याने वाहून गेल्याची घटना घडली. परंतु दक्ष असलेल्या सुरक्षा पाथकाच्या दुसऱ्या तुकडीने तातडीने बचाव मोहीम हाती घेऊन सर्व पाचही सुरक्षा कर्मचाऱ्यांना वाचविले.

नदीत वाहून गेलेल्या पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांत एनडीआरएफचे तीन व अग्निशामक दलाचे दोन कर्मचारी होते.  पहाटेपासूनच विरुपपुरम घाटात पर्यटकांची गर्दी झाली होती. 70 पर्यटकांना सुरक्षित किनाऱ्यावर आणल्यानंतर इतर पर्यटकांना आणण्यासाठी पाच कर्मचारी जात असताना पाण्याचा प्रवाह वाढला व त्यात बोट बुडण्याची दुर्घटना घडली. सुरवातीला एकच बोट असल्याने पर्यटकांच्या सुरक्षा कार्यात अडचण येत होती. त्यामुळे इतर दोन बोटी आणल्या गेल्या आणि एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी पर्यटकांना सुरक्षित आणण्याचे कार्य सुरू केले. परंतु अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना वाचविणाऱ्या सुरक्षा जवानांचीच बोट बुडाली. 

जिल्ह्यातील गंगावती तालुक्‍यातील विरुपापूर घाटात जर्मनीचे 11, फ्रान्स 5, स्वित्झर्लंड आणि यूएसएसह देशभरातून अनेक पर्यटक दाखल झाले होते. पर्यटकांनी पूर येण्याची भीती व्यक्त केल्याने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. पर्यटकांच्या संरक्षणासाठी एनडीआरएफची टीम विरुपपूर येथे दाखल झाली आणि आणि कारवाईस सुरवात झाली. पोलिस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी लक्ष ठेऊन आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDRF boat sink in Karnataka while saving foreigners