esakal | 'आता ब्रेक घेण्याची वेळ आली'; प्रशांत किशोर टि्वटरवर ट्रोल

बोलून बातमी शोधा

प्रशांत किशोर
'आता ब्रेक घेण्याची वेळ आली'; प्रशांत किशोर टि्वटरवर ट्रोल
sakal_logo
By
नामदेव कुंभार

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाच्या जबरदस्त कामगिरीनंतर प्रशात किशोर यांना अनेक जण मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहेत. पण प्रशात किशोर यांनी स्वत: मात्र वेगळीच घोषणा केली आहे. यापुढी मी निवडणूक रणनितीकार म्हणून काम करणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. "मी जे करतोय, ते काम मला पुढे सुरु ठेवायच नाही. मी भरपूर काम केलय. आता ब्रेक घेण्याची आणि आयुष्यात दुसर काही तरी करण्याची वेळ आहे. मला हे काम सोडायचे आहे" असे किशोर यांनी NDTV दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. पुन्हा राजकारणात प्रवेश करणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, मी अपयशी राजकारणी आहे.

बंगाल निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "मला निवडणुकीचे निकाल तृणमुलच्या बाजूने एकतर्फी वाटतात. निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागला आणि आमची प्रचार मोहीम कठीण केली. तृणमुल चांगल्या मताधिक्क्याने विजय मिळवत आहे." पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय आहेत, म्हणून भाजपा सगळ्याच निवडणुका जिंकणार नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव होत असला, तरी प्रशांत किशोर यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपाला दोन आकडी जागाही जिंकता येणार नाहीत असा दावा केला होता. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी केली, तर मी निवडणूक रणनितीचे काम सोडून देईन असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते. त्यामुळे युझर्स आता त्यांना प्रशांत किशोर यांचे टि्वटर सोडण्याची वाट पाहत आहोत असे म्हटले आहे