esakal | 'नवऱ्याच्या आयुष्यासाठी देशाने प्रार्थना करायची वेळ आली', चेतन चीतांच्या पत्नीचे भावनिक आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

'नवऱ्याच्या आयुष्यासाठी देशाने प्रार्थना करायची वेळ आली'

'नवऱ्याच्या आयुष्यासाठी देशाने प्रार्थना करायची वेळ आली'

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी आणि किर्ती चक्र पुरस्कार विजेते चेतन चीता (Chetan Cheetah) यांची आयुष्याबरोबर लढाई सुरु आहे. हरयाणातील झाज्जरमधील एम्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चेतन चीता यांना कोरोनाची बाधा झाली होती. मागच्या आठवड्यात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तरी चेतन चीता यांची प्रकृती गंभीर आहे. (Need nations prayer for my husbands life CRPF commandant Chetan Cheetahs condition critical)

नऊ दिवसानंतर बुधवारी एक थोडीशी दिलासा देणारी गोष्ट घडली होती. चेतन चीता यांना लावलेलं व्हेंटिलेटर काढण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचं सांगितलं होतं. पण गुरुवारी शरीरातील ऑक्सिनजची पातळी खालावल्याने पुन्हा त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आलं. चेतन चीता यांना कुठल्याही सहव्याधी नाहीत. फक्त हात ही त्यांची एक समस्या आहे. चकमकीच्यावेळी त्यांच्या हाताला गोळ्या लागल्या होत्या, असे कुटुंबीयांनी सांगितले.

हेही वाचा: UEFA Euro 2020: यूरोपीय फुटबॉल चॅम्पियनशीपसाठी Googleचे खास Doodle

१४ फेब्रुवारी २०१७ रोजी काश्मीरमधील बांदीपोराच्या हाजीन भागात चकमक झाली. त्यावेळी दहशतवाद्यांचा मुकाबला करताना चेतन चीता यांनी शरीरावर नऊ गोळ्या झेलल्या होत्या. पण त्या परिस्थितीवरही मात करुन हा वीर अधिकारी घरी परतला होता.

हेही वाचा: मनोज वाजपेयीची ऑनस्क्रीन मुलगी; जाहिराती, मालिकांमध्येही केलंय काम

"चेतन लढवय्ये आहेत हे मला माहित आहे. आम्ही ही लढाई सोडणार नाही. देव आमच्यावर असा अन्याय करु शकत नाही. आता देशवासियांच्या प्रार्थनेची गरज आहे" असे चीता यांच्या पत्नीने सांगितले तिच्या डोळ्यात अश्रू होते. चेतन चीता यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. चेतन चीता हे नऊ मे पासून हरयाणा झाज्जरमधील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. अधिक चांगल्या उपचारांसाठी कुटुंबीय त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्याचा विचार करत आहेत.