esakal | UEFA Euro 2020: यूरोपीय फुटबॉल चॅम्पियनशीपसाठी Googleचे खास Doodle
sakal

बोलून बातमी शोधा

euro

UEFA Euro 2020: यूरोपीय फुटबॉल चॅम्पियनशीपसाठी Googleचे खास Doodle

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

रोम: जगात सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन गुगलने (Google) डूडलच्या (Doodle) माध्यमातून आजपासून सुरू होणाऱ्या यूईएफए यूरोपीय फुटबॉल चॅम्पियनशिपमधील (UEFA European Football Championship) सर्व टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. ही स्पर्धा १९६० पासून सुरू झाली होती. यावर्षी या स्पर्धेचे विशेष म्हणजे यातील सामने संपूर्ण युरोपभर खेळवले जाणार आहेत. कोरोनामुळे (COVID-19) यूरो 2020 स्पर्धा आजपासून सुरू होत आहे.

ही स्पर्धा युरोपमधील 11 शहरांत होत आहे. यापुर्वी ही स्पर्धा 12 जून ते 12 जुलै 2020 दरम्यान होणार होती. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे ही स्पर्धा स्थगित केली होती. आता ती स्पर्धा 12 जून 2021 ते 12 जुलै 2021 दरम्यान खेळवली जात आहे. पण तरीही या स्पर्धेचे नाव यूईएफए यूरो 2020 (UEFA Euro 2020) असंच ठेवले आहे.

हेही वाचा: तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं

स्पर्धेच्या सुरवातीला इटली विरुद्ध तुर्की असा रंगतदार सामना होत आहे. यूईएफए यूरो चॅम्पियन पोर्तुगाल आणि फिफा विश्व कप विजेता फ्रान्ससह सर्व टीम सहा ग्रुपमध्ये विभागले आहेत. यातून प्रत्येक ग्रुपमधील टॉपच्या टीम पुढील मॅचसाठी क्वालिफाय करणार आहेत. 26 जूनपासून टॉप 16 संघ निवडून त्यांच्यात पुढील सामने होतील.