

From Apple to Ashram: Series on Neem Karoli Baba Set to Go Global
esakal
जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु नीम करोली बाबा यांची जन्मभूमी आता जागतिक पर्यटन नकाशावर झळकणार आहे. फिरोझाबाद जिल्ह्यातील अकबरपूर गावाचा कायापालट करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कंबर कसली असून, सुमारे ८.६५ कोटी रुपये खर्चून तिथे भव्य 'कन्व्हेंशन सेंटर' उभारले जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, एप्रिल २०२६ च्या अखेरीस हे केंद्र भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.