

NEET Success Story Auto Rickshaw Driver Son
esakal
Inspiring NEET Story : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ पोलीस ठाणे हद्दीतील मिर्झापूर पचपेड़वा कॉलनीत राहणाऱ्या 23 वर्षीय विशाल तिवारी याने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर NEET-UG परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. ऑटोचालकाचा मुलगा असलेल्या विशालने 720 पैकी 605 गुण मिळवत चौथ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. निकाल जाहीर होताच तिवारी कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले.