NEET Exam : ‘नीट’ परीक्षा रद्द करू नका;गुजरातेतील ५० विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव

नीट’ परीक्षा रद्द केली जाऊ नये, अशा विनंती करणारी याचिका गुजरातमधील ५६ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ‘नीट- यूजी’ परीक्षेततील अनियमिततेमुळे तसेच पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत, अशी मगणी करत सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल झाल्या आहेत.
NEET Exam
NEET Examsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षा रद्द केली जाऊ नये, अशा विनंती करणारी याचिका गुजरातमधील ५६ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ‘नीट- यूजी’ परीक्षेततील अनियमिततेमुळे तसेच पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत, अशी मगणी करत सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आता परीक्षा रद्द करू नये अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे. ‘नीट’ परीक्षेच्या अनुषंगाने दाखल याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ येत्या सोमवारी सुनावणी घेणार आहे. अन्य याचिकांसोबत या याचिकेवर सोमवारी सुनावणी होईल.

विद्यार्थ्यांकडून आंदोलन

‘नीट’ परीक्षा रद्द करण्यात आली तर लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी पडेल, असे सिद्धार्थ सिंघला आणि अन्य ५५ विद्यार्थ्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. ‘नीट’ परीक्षेतील अनियमितता चव्हाट्यावर आल्यानंतर दिल्लीसह देशाच्या इतर भागांत विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. अलीकडेच पार पडलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात देखील याचे तीव्र पडसाद उमटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.