NEET Exam : तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्र काढले

NEET Exam Kerala Marathi News
NEET Exam Kerala Marathi NewsNEET Exam Kerala Marathi News

कोटा-कोल्लम : नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्टच्या (NEET) परीक्षेत तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्रही काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील आहे. एकीकडे मार्थोमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीने असे काहीही घडलेले नाही, असे म्हटले आहे. दुसरीकडे विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हिजाब (Hijab) परिधान केलेल्या चार विद्यार्थिनी कोटाच्या मोदी कॉलेज सेंटरमध्ये पोहोचल्या. त्यांना पोलिसांनी गेटवर अडवले. पोलिसांनी त्यांना हिजाब काढण्यास सांगितला. मात्र, मुलींनी काढण्यास नकार दिला. नंतर पोलिसांनी मुलींना ड्रेस कोड समजावून सांगितला. तरीही त्या हिजाब काढण्यास तयार नव्हत्या. त्याचे कुटुंबीयही ठाम होते. यानंतर परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यास ती स्वत: जबाबदार असेल, असे त्यांच्याकडून लेखी लिहून घेण्यात आले.

NEET Exam Kerala Marathi News
Monsoon Session : कामकाज दिवसभरासाठी तहकूब; महागाई व जीएसटीवरून गदारोळ

परीक्षेच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना (Student) पूर्ण बाह्यांचे कपडेही घालता येत नाही. विद्यार्थ्यांनी असे केल्यास बाही कापल्यानंतरच परीक्षेला बसू दिले जाते. कानातले, घड्याळ अशा वस्तूही काढण्यास सांगितले जाते. पण मुली तोंड गुंडाळून आत गेल्याचे कोटामध्ये पहिल्यांदाच दिसले. त्यांची कसून तपासणी करण्यात आली.

पोलिसांनी गेटबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. काही विद्यार्थ्यांनी फुल बाह्यांचे कपडे घातले होते. त्यांच्या बाही कापून आत पाठवले होते. ज्यांनी हिजाब घातला होता त्यांना बाजूला केले होते. आतून आदेश आल्यानंतर मुलींना प्रवेश देण्यात आला, असे एएसआय गीता देवी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com