NEET: भावी डॉक्टरांना धक्का! MBBS प्रवेश प्रक्रिया थांबवण्यास सुप्रीम कोर्टाने का दिला नकार?

Supreme Court NTA Notice: न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांचा समावेश असलेल्या न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठाने परीक्षा प्रक्रियेच्या ‘पावित्र्या’बद्दल चिंता व्यक्त केली.
NEET|NTA Supreme Court
NEET|NTA Supreme CourtEsakal

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी NEET-UG 2024 च्या निकालावर आधारित यशस्वी उमेदवारांच्या MBBS आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला.

राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) ही भारतातील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पदवी स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे.

दरम्यान NEET परीक्षा 2024 मध्ये पेपर लीक आणि अनियमिततेच्या आरोपांबाबत सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) नोटीस बजावली आहे.

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांचा समावेश असलेल्या न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठाने परीक्षा प्रक्रियेच्या ‘पावित्र्या’बद्दल चिंता व्यक्त केली.

"परीक्षेच्या पावित्र्यावर परिणाम झाला आहे, आम्हाला उत्तर हवे आहे," अले खंडपीठाने म्हटले आहे.

परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचा आरोप करणाऱ्या 10 NEET उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

आरोप असूनही, सर्वोच्च न्यायालयाने यशस्वी उमेदवारांच्या एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

"आम्ही प्रवेश प्रक्रिया थांबवणार नाही. तुम्ही युक्तीवाद करत राहिला तर तो आम्ही फेटाळून लावू," असे न्यायालयाने सांगितले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.

याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, NEET-UG 2024 दरम्यान पेपर फुटल्याने काही उमेदवारांना अनुचित फायदा देत कलम 14 (समानतेचा अधिकार) चे उल्लंघन झाले आहे.

NEET|NTA Supreme Court
Amravati City: घोस्ट सिटी होणार राज्याची राजधानी, आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या भांडणात भकास होता विकास

संबंधित प्रकरणामध्ये, NEET-UG 2024 परीक्षेत अनेक उमेदवारांना ग्रेस गुण देण्याच्या NTA च्या निर्णयाबाबत सर्वोच्य न्यायालयात अतिरिक्त याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

फिजिक्स वालाचे सीईओ अलख पांडे यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. पांडे यांनी सुमारे 20,000 विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या, त्यांच्या आरोप आहे की, किमान 1,500 विद्यार्थ्यांना यादृच्छिकपणे 70 ते 80 ग्रेस गुण देण्यात आले आहेत.

"आमची जनहित याचिका उद्या सूचीबद्ध केली जाईल. ती पेपर लीक तसेच ग्रेस गुणांबाबत आहे," असे अलख पांडे म्हणाले.

NEET|NTA Supreme Court
D Purandeshwari: लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या डी पुरंदेश्वरी कोण? चंद्राबाबूंना गप्प करण्यासाठी भाजपची खेळी!

NTA द्वारे आयोजित NEET-UG परीक्षा, संपूर्ण भारतातील सरकारी आणि खाजगी संस्थांमधील MBBS, BDS, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आहे.

NEET-UG 2024 5 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. NEET 2024 ची तात्पुरती उत्तर की 29 मे रोजी जारी करण्यात आली होती तर अंतिम उत्तर की 4 जून रोजी जारी करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com