

NEET paper leak
english
पेपरफुटीवर देशभरात विद्यार्थ्यांचा संताप उफाळला आहे. दिल्लीत CJP च्या आंदोलनाने आता सरकारलाच थेट कठड्यावर उभे केले. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर सरकार नेमकं काय करतंय, असा प्रश्न आंदोलक विचारत आहेत. मोदींनी काल रात्री एका व्हिडिओ मॅसेजद्वारे नवीन कायदा आणण्याची घोषणा केली. पण २०२४ मध्ये देखील असाच कायदा आणल्या गेला होता... तरी NEET-UG, TETसारख्या परीक्षांचे पेपर फुटले, CBI ने ज्याला सुरुवातीला 'मुख्य सूत्रधार' मानले, त्यालाच क्लीन चिट देखील मिळाली... महाराष्ट्रातील TET प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार का आहे? हे सगळं कुणाचं अपयश आहे... ४ मुद्द्यात समजून घेऊया...