ब्रेकिंग : NEET PG 2022 परीक्षा नियोजित वेळतच होणार

NEET PG 2022 ची परीक्षा पुढे ढकल्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
NEET Exam Extension
NEET Exam Extensionesakal

नवी दिल्ली : नीट 2022 PG ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून, नीट PG 2022 ची परीक्षा नियोजित वेळेच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. NEET PG 2022 च्या उमेदवारांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन सादर केले होते. त्यात आगामी NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. NEET PG 2022 परीक्षा 21 मे रोजी नियोजित असून, ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी दिल्ली-NCR सह देशभरातील विद्यार्थ्यांनी एक निवेदन दिले होते. मात्र, आता ही परीक्षा नियोजित वेळेपत्राकानुसार होणार आहे. (Neet PG 2022 Exam News)

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सच्या नावाने जारी केलेल्या बनावट नोटीसमध्ये दावा करण्यात आला होता की, NEET PG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच आता ही परीक्षा 9 जुलै 2022 रोजी घेतली जाणार असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात होता. दरम्यान, ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नसून, 21 मे 2022 रोजी नियोजित वेळेनुसारच ही परीक्षा घेतली जाणार आहे असे पीआयबीच्या फॅक्ट चेकने केलेल्या ट्वीटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com