NEET-UG ची प्रवेश प्रक्रिया १९ जानेवारीपासून; असं असेल वेळापत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NEET Exam
NEET-UG ची प्रवेश प्रक्रिया १९ जानेवारीपासून; असं असेल वेळापत्रक

NEET-UG ची प्रवेश प्रक्रिया १९ जानेवारीपासून; असं असेल वेळापत्रक

नवी दिल्ली : NEET-UG च्या प्रवेश प्रक्रियेला येत्या १९ जानेवारीपासून सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी याचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे. ट्वीट करुन आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. (NEET UG counseling begin from January 19 Shcedule released)

मांडवीय यांनी म्हटलं की, "प्रिय विद्यार्थ्यांनो, NEET UG च्या प्रवेश प्रक्रियेला १९ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. तुम्ही सर्वजण देशाचे भविष्य आहात. आम्हाला आशा आहे की, आपण सर्वजण सेवा ही धर्म या मंत्रासह आपलं करियर पुढे न्याल. मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो"

दरम्यान, चारच दिवसांपूर्वी आरोग्य मंत्र्यांनी NEET PG प्रवेशाची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार, १२ जानेवारी २०२२ म्हणजेच कालपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. निवासी डॉक्टरांना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर MCC द्वारे ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top