दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा पुन्हा घेता येणार नाही : SC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court

दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा पुन्हा घेता येणार नाही : SC

sakal_logo
By
सुधीर काकडे

सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG परीक्षेच्या निकालासंदर्भात एक महत्वाचा निकाल दिला असून, दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा बुकलेट आणि उत्तरांच्या बुकलेटमध्ये साम्य नसल्याने परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. सुनावणी दरम्यान, सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी सांगितले की, १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जर या दोघांमुळे परवानगी दिली तर असे प्रकरणं समोर येण्यास सुरूवात होईल. दरवेळी विद्यार्थी अशा पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करतील.

हेही वाचा: RBI च्या नव्या 2 योजनांचा सामान्य नागरिकांना 'असा' होणार फायदा

सर्वोच्च न्यायालयाने यापुर्वीच परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास हिरवा झेंडा दाखवला होता. कोर्टाने १६ लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यास सरकारने परवानगी दिली होती. दरम्यान, मुंबई उच्चन्यायालयाने निकालावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली होती. उच्चन्यायालयाने दोन विद्यार्थ्यांसाठी परीक्षेवर निकालावर स्थिगिती आणण्यास विरोध केला होता. दोन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परत घेणं योग्य नसल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं.

loading image
go to top