

MBBS Admission
esakal
New Delhi: देशात डॉक्टर होण्यासाठी लाखो विद्यार्थी नीट (NEET) परीक्षेची तयारी करतात. मात्र, वैद्यकीय शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी असूनही एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण घेता येत नसल्याचे चित्र समोर आले आहे. यंदाच्या एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेत (NEET UG २०२६) हजारो जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणातील महागाई आणि खासगी महाविद्यालयांच्या शुल्काचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.