घाबरले नाही! युपी में का बा गाण्यावरून नोटीस आल्यानंतर नेहा सिंह राठोरची प्रतिक्रिया | neha singh rathore said that i am not scared on up police notice | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

neha singh rathore

घाबरले नाही! ;युपी में का बा', गाण्यावरून नोटीस आल्यानंतर नेहा सिंह राठोडची प्रतिक्रिया

नवी दिल्ली - यूपी में का बा' या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली लोकगायिका नेहा सिंह राठोडला यूपी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मी साधी गायिका आहे. बड्या नेत्यांसमोर मी काहीच नाही. पण नोटिस पाठवणे ही असहिष्णुता आहे. त्यांच्या मताला धोका निर्माण करणाऱ्या असंतोषाच्या किंवा टीकेच्या प्रत्येक आवाजाला घाबरवण्याचा हा प्रयत्न असल्याचं नेहाने म्हटलं आहे.

नेहा म्हणाली की, मी या गाण्याच्या बाजूने उभी आहे आणि यापुढेही गात राहीन. मला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मी अजिबात घाबरणार नाही. मी माझ्या वकिलांशी बोलणार आहे. राठोड म्हणाली की, पोलिसांनी आधी माझ्या पतीला फसवण्याचा प्रयत्न केला. मला नोटीस आणि अडकवण्यासाठी पोलिसांनी जी तत्परता दाखवली, तशी तत्परता इतर प्रकरणांमध्ये दाखवली तर राज्याची स्थिती चांगली होईल.

नेहाने नुकतेच 'यूपी में का बा' या गाण्याचे नवीन व्हर्जन अपलोड केले आहे. ज्यामध्ये त्यांनी झोपडीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 वर्षीय प्रमिला दीक्षित आणि त्यांची 20 वर्षीय मुलगी नेहा यांच्याविषयी सांगितले होते. याबाबत प्रशासनावर अनेक गंभीर आरोप झाले होते.

यूपी पोलिसांनी त्यांना या गाण्यासंदर्भात मंगळवारी रात्री नोटीस पाठवली आहे, ज्यामध्ये म्हटले की, हे गाणे समाजात तणावाची परिस्थिती निर्माण करत आहे. राठोड यांना गाण्याविषयी आणि ते कसे बनवले गेले याबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :BjpUttar Pradesh