

Youth Protesters Clash with Oli's Party
Sakal
काठमांडू : नेपाळमध्ये भारताच्या सीमेजवळ असलेल्या बारा नावाच्या जिल्ह्यात गुरुवारी (ता. २०) पुन्हा तणाव निर्माण झाला. युवा आंदोलक आणि पदच्युत पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यामध्ये झालेल्या धुमश्चक्रीत दहा जण जखमी झाले. जखमींमध्ये सहा पोलिसांचा समावेश आहे. या तणावानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने पुन्हा या भागात संचारबंदी लागू केली आहे.