

Nepal Floods Hit Hydropower Projects Hard 933 Workers Missing As Rescue Teams Search Tunnels With India China Support
sakal
नुवाकोट (नेपाळ): नेपाळमधील जलप्रलयाने विद्युत प्रकल्पांनाही मोठा तडाखा दिला असून, विविध प्रकल्पांच्या ठिकाणी ९३३ कर्मचारी व कामगार २६ ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. यातील ६०० हून अधिक जण बोगद्यांमध्ये अडकले असण्याची शक्यता असून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत भारत व चीनमधील तज्ज्ञ पथकेही मदत करीत आहेत.