
जगतदाल : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अमूल्य योगदान दिले. प. बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील श्यामनगर रेल्वे स्थानकापासून जेमतेम दीड किलोमीटरवर बोस यांच्या ऐतिहासिक संबंध असलेले नोआपारा पोलिस ठाणे आहे. ब्रिटिशांनी १९३१ मध्ये ताब्यात घेतल्यानंतर नेताजी काही काळ या ठाण्यात थांबले होते. या पोलिस ठाण्याने बोस यांच्या स्मृतींचे जतन केले आहे.