
Subhash Chandra Bose birth anniversary : आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. धैर्य, साहस, दृढनिश्चय, संघर्ष यांचं उत्तम उदाहरण नेताजी बोस होते. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूँगा हा नारा सुद्धा एकदा उद्गारला तरी अंगात रक्त संचार होतं.
ओडिशा राज्यातील कटक येथे 23 जानेवारी 1897 रोजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. बोस लहानपणापासून खूप हुशार आणि देशप्रेमी होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजींनी अनमोल योगदान दिले. १९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला.
23ऑगस्ट, 1945 नेताजींचे विमान दुर्घटनेत निधन झाले मात्र त्यांचे खरंच निधन झाले का? हा प्रश्न आजही उपस्थित केला जातो. बोस जिवंत असल्याचे दाखले दिले जातात, हे नेमकं प्रकरण काय, याविषयी आपण जाणून घेऊया. (netaji subhash chandra bose birth anniversary death mystery)
१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. या प्रवासादरम्यानच ते बेपत्ता झाले. त्यानंतर ऑगस्ट २३ १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत ते खूपच भाजले होते यातच नेताजींचे आज निधन झाले.
त्यानंतर भारतात जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा सुरवातील हा अपघात नसून हत्या असल्याचा दावा केला गेला नंतर मात्र काही वर्षानंतर नेताजी जीवंत असल्याचाही दावा केला गेला.
खरंच नेताजी सुभाषचंद्र बोस जीवंत होते?
मुळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हे आजवर न उलगडलेलं कोडं आहे. भारताने देखील यावर मौन धारण केले होते. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला असला तरी त्यांचे पार्थिव शरीर कधीच समोर आले नाही.
बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला नसल्याचे अनेकदा बोलले जाते मात्र यावर मोहर तेव्हा लागली जेव्हा उत्तर प्रदेशात फैझाबाद येथे एक गुमनामी बाबा नावाचे साधू अचानक समोर आले आणि हे एकटे बाबा बंगाली होते. ते फार कोणाशी बोलत नसे आणि बोलल्यास पडद्याआडून बोलत असत. अनेकांनी तेच सुभाषचंद्र बोस असल्याचे म्हटले पण यावर भारत सरकारने कायम अविश्वास दाखवला.
मात्र जेव्हा गुमनामी बाबांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्याकडे काही सामानात नेताजींचे अनेक खासगी फोटो, पत्रे आणि पुस्तके सापडली. एका मान्यताप्राप्त हस्ताक्षर तज्ञाने त्यांचे हस्ताक्षर नेताजींशी जुळत असल्याचाही दावा केला होता. मात्र भारत सरकार ने लगेच दुसरा हस्ताक्षर तज्ञ नेमला हे खोटं असल्याचं म्हटलं.
एखाद्या साधू बाबाकडे असे नेताजीचे खाजगी फोटो, पत्रे आणि पुस्तके सापडणे, हे जरा विचलित करणारं होतं. यावर आजही प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.