airport in Ayodhya to be named
airport in Ayodhya to be named

'महर्षी वाल्मिकी'; अयोध्येतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव ठरलं!

अयोध्येतील विमानतळाचं उद्घाटन ३० डिसेंबर रोजी होणार असून त्याचे नाव महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्याधाम असं ठेवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- अयोध्येतील विमानतळाचं उद्घाटन ३० डिसेंबर रोजी होणार असून त्याचे नाव महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्याधाम असं ठेवण्यात येणार आहे. महर्षी वाल्मिकी हे रामायण या महाकाव्याचे रचयता मानले जातात. त्यांच्या नावावरुन आता विमानतळाला 'महर्षी वाल्मिकी' म्हणून ओळखं जाईल. (New airport in Ayodhya to be named after Maharishi Valmiki)

अयोध्येच्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात आल्यानंतर श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देखील नाव बदलण्यात आले आहे. याचे नाव आता महर्षी वाल्मिकी विमानतळ असेल असं सूत्रांनी सांगितलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानी केंद्राकडे नाव बदलाबाबत प्रस्ताव पाठवला होता. तो स्वीकारण्यात आलाय. पंतप्रधान मोदी या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी ३० डिसेंबरला अयोध्येत येणार आहेत.

airport in Ayodhya to be named
राम मंदिराच्या उभारणीचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे, पाहा फोटो

सध्या अयोध्येमध्ये राम मंदिराच्या प्रतिष्ठापणेचा सोहळा आयोजित करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. राम लल्लाची प्रतिष्ठापणा २२ जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत. या कार्यक्रमासाठी देशासह विदेशातील प्रमुख व्यक्ती अयोध्येत येणार आहेत. त्यादृष्टीने पायाभूत सुविधा सक्षम करण्याकडे भर दिला जात आहे. रेल्वे स्टेशन आणि विमानतळ त्याच दृष्टीने टाकलेलं पाऊल आहे.

airport in Ayodhya to be named
Mamata Banerjee: येचुरींनंतर ममता बॅनर्जीही जाणार नाहीत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला?; 'हे' आहे कारण

नवे विमानतळ १४५० कोटी रुपये खर्च करुन बनवण्यात आलं आहे. संपूर्ण विमानतळ हे ६,५०० स्क्वेअर मीटर परिसरात पसरलं आहे. दररोज १० लाख प्रवाशांना सेवा देऊ शकेल इतकी क्षमता विमानतळाची आहे. विमानतळाची इमारत ही राम मंदिराच्या आकारासारखी बांधण्यात आली आहे. विमानतळाच्या आत स्थानिक कलाकुसर करण्यात आली आहे. प्रभू राम यांच्या जीवनाविषयी माहिती देण्यारी कला विमानतळामध्ये पाहायला मिळेल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com