'भारत-चीन सीमेवरील...', नवे लष्करप्रमुख मनोज पांडे यांचं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Army Chief Manoj Pande on India China Border Dispute

'भारत-चीन सीमेवरील...', नवे लष्करप्रमुख मनोज पांडे यांचं वक्तव्य

नवी दिल्ली : जनरल मनोज पांडे यांनी भारताचे नवे लष्करप्रमुख (New Army Chief General Manoj Pande) म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चीनबाबत वक्तव्य केलं आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भारत आणि चीन सीमेवरील (India China Border Dispute) कुठल्याही भूभागाचे नुकसान होऊ देणार नाही, अशी भूमिका मनोज पांडे यांनी मांडली. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा: जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला लष्करप्रमुखाचा पदभार

भारत-चीन नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सध्या ठीक आहे. आमचे सैनिक कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. चीनने सीमेवरील स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले. पण, आम्ही त्यांना योग्य उत्तर दिले. सध्या सीमेवर अतिरिक्त उपकरणे, सैन्य तैनात केले आहे. लॉजिस्टीक आणि ऑपरेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावरही आम्ही विशेष लक्ष देत आहोत, असंही मनोज पांडे म्हणाले.

भारत-चीन सीमावादावर सध्या चर्चा सुरू आहे. यावर लवकरच तोडगा निघेल अशी खात्री आहे, असंही लष्करप्रमुख म्हणाले. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धावरही देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पारंपरीक युद्ध लढण्यासाठी भारताला देखील क्षमता वाढविण्यावर भर द्यावा लागेल. आम्हाला आमची स्वदेशी शस्त्र प्रणाली आणि उपकरणे तयार करण्याची गरज आहे. आम्हाला मेक इन इंडियावर भर देणे गरजेचे आहे. आम्ही भविष्यातील संघर्षासाठी स्वतः तयार करत आहोत, असंही मनोज पांडे म्हणाले.

Web Title: New Army Chief Manoj Pande Statement On India China Border Dispute

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India China BorderArmy
go to top