Arvind Kejriwal
Arvind Kejriwalesakal

Arvind Kejriwal: ''नोटांवर हवा लक्ष्मी, गणपतीचा फोटो'' केजरीवालांचं हिंदू कार्ड...

नवी दिल्लीः आपल्या देशात देव-देवतांवर श्रद्धा असणारे लोक आहेत. त्यामुळे चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो पाहिजेत, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केलीय.

महात्मा गांधी यांच्यासह देवी लक्ष्मी आणि गणपती यांचे फोटो नोटांवर पाहिजेत, त्यासाठी आपण पंतप्रधानांसह रिझर्व्ह बँकेकडे मागणी करणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. केजरीवाल यांच्या या अनोख्या मागणीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल बोलत होते. सध्या हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. गुजरातच्या निवडणुकादेखील प्रस्तावित आहेत. त्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या या मागणीकडे विशेष लक्ष जात आहे. केजरीवाल यांनी गोवा निवडणुकीतदेखील अशीच धार्मिक खेळी खेळली होती.

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, महात्मा गांधींसोबत नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो पाहिजे. लक्ष्मीपूजनावेळी मला ही कल्पना सूचली. भारतात लक्ष्मी आणि गणपतीवर श्रद्धा असणारे लोक आहेत. त्यामुळे या देवतांचे फोटो चलनी नोटांवर पाहिजेत. या मागणीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिझर्व्ह बँकेला पत्र देणार असल्याचंही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

निवडणुका जिंकण्यासाठी हिंदुत्व किती गरजेचं आहे? हेच केजरीवाल यांच्या भूमिकेवरुन दिसून येतं. यापूर्वी गोव्यात केजरीवालांनी अशीच खेळी केली होती. दिल्लीतदेखील केजरीवाल विविध धार्मिक कार्यक्रम घेत असतात.

सध्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुका लागलेल्या आहेत. शिवाय गुजरातमध्येदेखील आम आदमी पक्षाने लक्ष घातलेलं आहे. या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी केजरीवालांचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे हे हिंदू कार्ड त्यांना किती उपयोगी ठरेल, हे कळेलच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com