esakal | प्रत्येक जिल्ह्यांत महाविद्यालय हवे
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

New Delhi : प्रत्येक जिल्ह्यांत महाविद्यालय हवे

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून प्रत्येक जिल्ह्यांत पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची सुविधा असलेले किमान एक तरी वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे. त्यादृष्टीनेच आमच्या सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

राजस्थानात बासवाड़ा, सिरोही, हनुमानगड व दौसा या जिल्ह्यांतील चार वैद्यकीय महाविद्यालयांचे तसेच जयपूर येथील पेट्रोरसायन प्रौद्योगिकी संस्थेचे (सीआयपीईटी) उदघाटन पंतप्रधानांनी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेत्या वसुंधरा राजे हेही सहभागी झाले होते.

कोरोना काळात देशाच्या आरोग्य सेवेत पायाभूत सुधारणा करण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाचा परीघ वाढविण्यासाठीही केंद्राने प्राधान्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की वैद्यकीय शिक्षणात आयुर्वेद व योगशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मागील ७ वर्षांत देशभरात १०० हून जास्त नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबाबत वेगाने काम सुरू आहे.पूर्वोत्तर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) च्या स्थापनेच्या मुद्यावरून प्रश्न उपस्थित झाले व अनेक आरोपही झाले.

पण या संस्थेचा मोठा प्रभाव देशभरातील वैद्यकीय शिक्षणप्रणाली व आरोग्य सेवांवर पडला आहे. या संस्थेचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दिसण्यास आता प्रारंभ झाला आहे, असेही मोदी म्हणाले.

loading image
go to top