esakal | New Delhi : सणासुदीच्या उत्साहात नियमांचा विसर
sakal

बोलून बातमी शोधा

new delhi

New Delhi : सणासुदीच्या उत्साहात नियमांचा विसर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात सणासुदीमुळे उत्साहाच्या भरात कोरोना सुरक्षा नियमांकडे मात्र दुर्लक्षच होत असल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. केवळ १३ टक्के नागरिकांच्या दृष्टीने मास्कची पूर्तता उपयुक्त आहे, तर सोशल डिस्टन्सिंगबाबत केवळ सहा टक्के नागरिक अनुकूल आहेत.लोकलसर्कल्स या संस्थेने डिजिटल माध्यमातून हे सर्वेक्षण केले. शहरे, जिल्ह्यांतील लोक कशा प्रकारे नियमांची पुर्तता करीत आहेत याची माहिती घेण्यात आली. विमान, रेल्वे, बसने प्रवास करताना; विमानतळ, रेल्वे स्थानक व बस स्थानकांवर वावरताना तसेच लसीकरण केंद्रावर असताना किती नियम पाळले हे सुद्धा जाणून घेण्यात आले. त्यानुसार नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादावरून हे निष्कर्ष काढण्यात आले.

कोरोना गेल्याचा समज

याच संस्थेने यंदा जूनमध्ये सर्वेक्षण केले होते. त्याचा तपशील सहा जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. त्या वेळी मास्कसाठी २९, तर सोशल डिस्टन्सिंगसाठी ११ टक्के अनुकूलता असल्याचे दिसून आले होते. यात अनुक्रमे १३ आणि सहा टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यावरून कोरोना गेल्याचा अनेकांचा समज झाल्याचे दिसून येते, अशी टिप्पणी संस्थेचे संस्थापक सचिन टापरीया यांनी केली.

धोकादायक चिन्हे...

  1. यंदा सणासुदीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असताना एकत्रित कार्यक्रम, शॉपिंग, सामाजिक कार्यक्रमांचे प्रमाण वाढल्याने कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता जास्त

  2. फेब्रुवारी-मार्चच्या तुलनेत प्रवासाचे उदंड प्रमाण वाढले

  3. लसीकरण केंद्रांवर मास्कची पूर्तता होत असली तरी सोशल डिस्टन्सिंगची पुरेसे नाही

  4. बाजारपेठांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची पूर्तता होत नसल्याचा ४० टक्के नागरिकांचा कौल

  5. यंदा सणासुदीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असताना एकत्रित कार्यक्रम, शॉपिंग, सामाजिक कार्यक्रमांचे प्रमाण वाढल्याने कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता जास्त

  6. फेब्रुवारी-मार्चच्या तुलनेत प्रवासाचे उदंड प्रमाण वाढले

  7. लसीकरण केंद्रांवर मास्कची पूर्तता होत असली तरी सोशल डिस्टन्सिंगची पुरेसे नाही

  8. बाजारपेठांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची पूर्तता होत नसल्याचा ४० टक्के नागरिकांचा कौल

loading image
go to top