esakal | New Delhi : यंदा गरबा- दांडियांना परवानगी नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

New Delhi : यंदा गरबा- दांडियांना परवानगी नाहीच

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नवरात्रोत्सवाची उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, बिहारसह अनेक राज्यांच्या सरकारांनी कोरोना विषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी करीत गरबा, दांडिया आणि गर्दी जमविणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.

कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. बिहारमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. परंतु भाविकांना पूजेदरम्यान नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. मास्क घालणे आणि शारीरिक अंतराची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. बिहार सरकारने दुर्गा पूजेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार दुर्गा पूजेदरम्यान कोणत्याही कार्यक्रमापूर्वी प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. मंडप, मेळा आणि मिरवणुकीत जाणाऱ्यांना लसीचा किमान एक डोस घेणे बंधनकारक असेल. एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्यावर निर्बंध असतील.

झारखंडमध्येही कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाली असली, तरी राज्य सरकार संसर्गाचा धोका पत्करणार नाही. मार्गदर्शक सूचना जारी करताना सरकारने भाविकांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. पूजा आणि मंडपांचा आकार लहान असेल. दुर्गेची मूर्ती पाच फुटांपेक्षा जास्त नसावी. कार्यक्रमादरम्यान प्रसाद वितरीत केला जाणार नाही. त्याच वेळी १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना मंडपामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top