PM Modi Attacks Congress Over 'Vande Mataram'
Sakal
देश
Narendra Modi : "१९३७ मध्ये वंदे मातरम्चे तुकडे पाडून फाळणीची बीजे पेरली" पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, एवढा अन्याय का झाला..?
PM Modi Attacks Congress Over 'Vande Mataram' : "१९३७ मध्ये 'वंदे मातरम्' गीतातील महत्त्वाच्या ओळी वगळून देशाच्या फाळणीची बीजे पेरली गेली" - १५० व्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका; 'वंदे मातरम्' हे मंत्र, ऊर्जा आणि भारताचे भविष्य आहे.
नवी दिल्ली : ‘‘वंदे मातरम्’ या गीतामधील महत्त्वाच्या ओळी या १९३७ मध्येच हटविण्यात आल्या होत्या. देशाच्या फाळणीची बीजे यामुळेच पेरली गेली होती,’’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करत पुन्हा काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानास दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत पुढील वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या स्मरणोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

