मोदीच सर्वांत लोकप्रिय नेते

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली  : नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) निर्णयामुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सामान्य जनमानसातील लोकप्रियता कायम असून, अनेकांची त्यांच्याबाबतची मते अनुकूल आहेत. अर्थव्यवस्थेची वाढ आणि तिच्या दिशेबाबत लोक आशावादी असल्याचा दावा अमेरिकेतील "प्यू रिसर्च सेंटर'ने केला आहे. काही दिवसांपूर्वी या संस्थेने देशाच्या अनेक भागांत सर्वेक्षण केले होते. यामध्ये दोन हजारांपेक्षाही अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली होती.

सरकारची पाचपैकी तीन वर्षे संपल्याने सरकारचा हनीमून पीरिएडही संपुष्टात आला आहे. एवढे दिवस उलटल्यानंतर भारतीय जनतेचे मोदींवरील प्रेम मात्र कायम आहे. तीन वर्षांपूर्वी देशातील दहापैकी नऊ जण हे मोदींबाबत अनुकूल मत बाळगून होते. यंदा हेच प्रमाण सातवर आले असल्याचे "प्यू' ने म्हटले आहे. दहापैकी आठ जण हे देशातील आर्थिक स्थितीबाबत समाधानी असून, सध्याची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार ज्या दिशेने काम करते आहे, त्यावर सामान्य जनता समाधानी असून, देश योग्य मार्गावर असल्याची त्यांची भावना असल्याचेही हे सर्वेक्षण सांगते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new delhi news Modi is the most popular leader