नवी दिल्ली : पृथ्वीराज चव्हाण, थोपटे, वरपुडकरांचे नाव चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज चव्हाण

नवी दिल्ली : पृथ्वीराज चव्हाण, थोपटे, वरपुडकरांचे नाव चर्चेत

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील तापलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये विधानसभाध्यक्ष निवडीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभाध्यक्षपद काँग्रेसकडे असल्याने या पदासाठी संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या नावांवर कॉंग्रेस श्रेष्ठींच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून कळते.

हेही वाचा: Pune Corporation Election: निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरील ईडीची कारवाई म्हणजे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याची टीका तिन्ही पक्षांकडून केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर काल दिल्लीत काँग्रेस प्रदेश प्रभारी एच. के.पाटील, दाखल झाले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते, असे समजते. पक्षाचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासमवेत महाराष्ट्रातील नेत्यांची या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे समजते. विधानसभाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर ही नावे काँग्रेस अध्यक्षांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडे कोणतेही प्रभावी पद नसल्याने संग्राम थोपटे यांची विधानसभाध्यक्षपदी निवड करावी असा काँग्रेसमधील एका गटाचा युक्तिवाद आहे. तर, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण गट सुरेश वरपुडकर यांच्या नावासाठी आग्रही आहे.

चव्हाणांपुढे अडथळा

दुसरीकडे, ज्येष्ठत्व आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा अनुभव या जमेच्या बाजू लक्षात घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांना ही संधी दिली जावी, असे मत काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचे आहे. परंतु, असंतुष्ट नेत्यांच्या जी-२३ गटामध्ये चव्हाण यांचे नाव राहिले असल्याने त्यांच्या मार्गात अडसर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: New Delhi Prithviraj Chavan Thopte Varpudkar Under Discussion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top